मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून (bjp) हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर नाराज आहेत. मात्र ते कट्टर शिवसैनिक आहेत. काही ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू आहेत. मात्र भाजपला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही असे संजय राऊत (sanjy raut) म्हणाले आहेत.
शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्ता आणि पैशासाठी स्वतःला विकणारी सेना नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात वापरून सत्ता पाडण्याचा डाव काही जणांचा आहे. मात्र हा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
मंत्री एकनाथ शिंदेसह (eknath shinde) शिवसेनेचे काही आमदार काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. ते मुंबईत नाहीत अशी माहिती देखील संजय राऊत यांनी दिली. मात्र शिवसेनेतील काही आमदारांचे वर्षा बंगल्यावर बैठक होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महा विकासआघाडी सरकार पाडण्याचे षडयंत्र हे यशस्वी होणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
गुजरातमधील भाजपकडून शिवसेना आमदारांची सुरतमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा डाव भाजपचा आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर केलेला आहे.
एकनाथ शिंदे यांचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अपार निष्ठा आहे. शिवसेनेच्या कठीण काळातही त्यांनी सेनेची साथ कधीही सोडली नाही. त्यामुळे मला वाटत नाही की, एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. मात्र ते नाराज असतील तर आम्ही ते मान्य करू शकणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.


previous post