Tarun Bharat

“भाजपला नवीन ४० भोंगे मिळालेत, त्यांना…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा बंडखोर आमदारांकर निशाणा साधला. शिवसेना संजय राऊतांमुळे संपत चाललीये, असा आरोप बंडखोर आमदारांकडून केला जातोय. यावर राऊत म्हणाले, “भाजपने (BJP) माझ्यावरच बोलणं थांबवलं आहे. त्यांना नवीन ४० भोंगे मिळाले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते बोलत आहेत. त्यांना बोलू द्या. इतके वर्ष आम्ही सोबत काम केलंय. आजही त्यांना आमचे सहकारी मानतो.”

नाशिक राजकीयदृष्ट्या चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. नाशिक शहर, महापालिका आणि जिल्हा नेहमीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहिलेला आहे. सगळे माजी नगरसेवक मला भेटले. महापालिकेची तयारी सुरूये. कधीही निवडणुका झाल्या तरी महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता येईल. तिकडे काय घडतंय, यांच्याशी नाशिकचा संबंध नाही,” असं राऊत म्हणाले.

हे ही वाचा : धनुष्यबाण आमचाच! उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावलं

दरम्यान, धनुष्यबाण शिवसेनेचाच आहे. कुठेही जाणार नाही. भाजपने माझ्यासोबत बोलणं थांबवलंय. त्यांना ४० भोंगे मिळालेत. त्यांच्याच माध्यमातून ते बोलत आहेत. आम्ही आजही त्यांना आमचे सहकारी मानतो. आग्रहानं त्यांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत. आमच्या जोरावर ते निवडून आले. आता तिकडे गेले. मात्र पुन्हा निवडून येणार नाहीत, हे मी ठामपणे सांगू शकतो, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं.

शहरातील असो की जिल्ह्यातील शिवसेना आहे तिथेच आहे. एक-दोन लोक पळून गेले म्हणजे त्यांच्याबरोबर शिवसेना गेली असं नाही. मला इथे येऊन पाहण्याची अजिबात गरज नव्हती. तरी मला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी वाटली. मी कालपासून आलोय. मालेगाव, नांदगाव या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी मला भेटून गेले आहेत. उद्या परत भेटणार आहेत. उद्या काही नवीन लोक शिवसेनेशी जोडले जाणार आहेत.

“हा जो धुरळा उडाला आहे, ते कृत्रिम वादळ आहे. ती वावटळ आहे, ती दूर होईल आणि शिवसेना पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. ती पुढे गेलेली दिसेल,” असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : संजय पांडेंच्या अडचणी वाढल्या, CBI कडून 3 गुन्हे दाखल

Related Stories

ऑगस्टपर्यंत संसर्गाचे प्रमाण शून्यावर : डॉ. रोहिदास बोरसे

prashant_c

निलेश साबळेंनी मागितली राणेंची माफी

Sumit Tambekar

मोहाली, लुधियाना आणि जालंधरमध्ये होणार चार नवीन कोविड टेस्टिंग लॅब

Rohan_P

कासची उंची वाढली… आमच्या रस्त्याचं काय?

Patil_p

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर

Abhijeet Shinde

संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!