Tarun Bharat

अशा घटना घडत राहिल्यास श्रीलंका आणि युक्रेनपेक्षा वाईट परिस्थिती : खा.संजय राऊत

Advertisements

ऑनलाईन टिम : नवी दिल्ली

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील समुदायांमधील तणावाच्या दरम्यान, शिवसेनेचे संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपवर निशाणा साधून म्हटले की, देशातील मोठ-मोठ्या शहरांमध्ये अशा घटना घडत राहिल्यास शेजारील श्रीलंका आणि युद्धग्रस्त युक्रेनपेक्षा भारताच्या अर्थव्यवस्थेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. शिवसेना नेते संजय राउत यांनी दिल्लीतील हिंसाचाराचा संबंध दिल्लीत होणाऱ्या नागरी निवडणुकांशी जोडला आहे.

देशाची राजधानी दिल्ली येथील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत शनिवारी हिंसाचार झाला. यात पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. गृहमंत्री अमित शहा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तर “जात, पंथ आणि धर्माचा विचार न करता” गुंतलेल्यांवर कारवाई केली जाईल.” असे दिल्ली पोलिसांनी सांगितलेले आहे.

“देशातील मोठ्या शहरांमध्ये… ज्या प्रकारे परिस्थिती तणावपूर्ण आहे किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. राष्ट्रीय राजधानीत दंगली होत आहेत. दिल्ली हे केंद्रशासित राज्य आहे… ते एक संघराज्य प्रदेश आहे.”असे खासदार राऊत यांनी सांगितले.
दिल्ली एमसीडी म्हणजेच दिल्ली महानगरपालिकेची निवडणुक होणार आहे. एकतर, निवडणुका नियोजित तारखेच्या पुढे ढकलल्या गेल्या आहेत आणि आता त्यातच दंगली होत आहेत. हे सर्व जे घडत आहे, ते फक्त नागरी निवडणुका जिंकण्यासाठी आहे. कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही.”

केंद्रसरकारने निवडणूक आयोगाला दिल्लीतील तीन नागरी संस्थांचे विलीनीकरण करण्यात येईल असे सांगितल्यानंतर आयोगाने दिल्लीतील नागरी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. संसदेत एमसीडी एकीकरण विधेयक मंजूर झाल्यानंतर एका पर्यवेक्षण अधिकाऱ्याची लवकरच नियुक्ती होईल असे केंद्रसरकारने सांगितले.

Related Stories

वृत्तपत्र कागदावरील आयात शुल्क हटवा

Patil_p

Municipal Election 2022 : कोल्हापूर मनपा आरक्षण सोडतमध्ये कोणाला किती प्रभाग; जाणून घ्या एका क्लिकवर

Archana Banage

कर्नाटकात पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Archana Banage

रुग्णांना स्टेरॉइड देणे शक्यतो टाळा

Patil_p

सत्तासंग्राम

Amit Kulkarni

केरळचे उच्च शिक्षण मंत्री के. टी. जलील कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar
error: Content is protected !!