Tarun Bharat

घोडेबाजार टाळण्यासाठी मविआनं पाऊल उचललं आहे- संजय राऊत

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबई:महाराष्ट्राचे राजकारण अतिशय प्रदुषित आणि गढुळ झाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अधिक बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही, घोडेबाजार हा शब्द अत्यंत वाईट पध्दतीने महाराष्ट्रात सुरु झाल्याचे मला दिसतयं.राजकारणात जो पैसा येतो तो कुठुन येतो याची चौकशी ईडीने करावी अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि मविआतील नेते विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटण्यास गेले आहेत याविषयी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. घोडेबाजार टाळण्यासाठी मविआने पाऊल उचलल्याचीही माहिती संजय राऊत यांनी दिली.

काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी सरकार कमी पडतंय
पुढे बोलताना ते म्हणाले, काश्मीरमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे.गृहमंत्री अमित शहा यांनी याठिकाणी भेट दिली. सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, १९९० मध्ये जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आजही आहे. काश्मिरी पंडितांची घरवापसी याविषय़ी खूप गाजावाजा केला गेला. पण ३७० कलम हटवल्या नंतरही परिस्थिती आणखी बिघडली आहे.आजही दोन लोकांची हत्या झाली. काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी सरकार कमी पडतंय. काश्मीरात दुसऱ्या पक्षाचं सरकार असतं तर भाजपनं कांगावा केला असता असा टोला राऊतांनी लगावला.

ज्ञानव्यापीच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, आधी काश्मिरी पंडितांचे प्राण वाचवा मग मंदिराविषयी बोला. मंदिर-मशिदीपेक्षा काश्मिरातील हिंदूच्या सुरक्षेकडे लक्ष द्या असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. पुढे बोलताना ते म्हणाले, कश्मिर फाईंल्सचं प्रमोशन केलं गेलं. पंतप्रधानांच्या आशीर्वादाने चार-पाचशे कोट रुपये कमावले गेले.पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी फक्त पलायनचं आहे. आज जी हत्या सुरु आहे त्यावर काश्मिर-२ चित्रपट निर्माण करावां. आणि याला जबाबदार कोण आहे ते लाकांच्यासमोर यावं असेही राऊत म्हाणाले.

Related Stories

‘शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा’

Abhijeet Shinde

कोल्हापुरातील पूरस्थिती Live Update फक्त एका क्लिकवर : काळम्मावाडीतून १००० क्युसेक विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

इचलकरंजीत समूह संसर्ग? 8 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सांगरुळ येथे शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

Sumit Tambekar

केबल कट ; करमणूक थांबली

Patil_p

उत्तराखंड : मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेअंतर्गत 70 हजार लोकांना मिळणार रोजगार

Rohan_P
error: Content is protected !!