Tarun Bharat

…म्हणून भावना गवळींना प्रतोद पदावरून हटवले, संजय राऊतांनी केला खुलासा

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे गट आणि भाजप सरकार सत्तेत आलं. दरम्यान, शिंदेंच्या बंडांनंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. यांनतर शिवसेनेचे १२ खासदार शिन्देगटासोबत जाणार अशी चर्चा सुरु रंगली होती. आत या सर्व प्रकारानंतर शिवसेनेने खासदार भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून हटवलं आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहत शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून दूर केले आहे. यावर आज खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. व्हीप बदलणं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेत मुख्य प्रतोद पदाचं महत्त्व फार असतं. गवळी यांना काही कायदेशीर लढायांमुळे संसदेत उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे राऊत म्हणाले.

हे ही वाचा : वारकऱ्यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री

काय म्हणाल संजय राऊत –
व्हीप बदलणं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेत मुख्य प्रतोद पदाचं महत्त्व फार असतं. पुढच्या अडीच वर्षात अनेक निर्णय होतील. कामाला गती मिळायला हवी. भावना गवळी उत्तम काम करत आहेत. पण त्यांच्या काही कायदेशीर लढायांमुळे त्यांना दिल्लीत संसदेत उपस्थित राहाता येत नाही असं अनेकदा दिसलं. अशा वेळी तिथे संसदेत मुख्य प्रतोद म्हणून व्यक्ती उपस्थित राहाणं आवश्यक असतं. काही आदेश काढायचे असतात, काही व्हीप काढायचे असतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सगळ्यांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

राजन विचारे लोकसभेतील नवे मुख्य प्रतोदपद –
बुधवारी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिंदे गटानं प्रतोद बदलल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठ्या पेचप्रसंगाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी सतर्कतेचा उपाय म्हणून शिवसेनेनं प्रतोद बदलल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.

Related Stories

तुम्ही काय पेरता हे लक्षात आलं पाहिजे; चंद्रकांतदादांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

Abhijeet Khandekar

“मोदी सुद्धा थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात सत्ता, पॉवर”

Archana Banage

पालिकेच्या वसुली पथकाचे नियोजन कोलमडले

Patil_p

बंगाली अभिनेत्री कोयल मल्लिकला कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

उत्तराखंडात जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

सत्ता आल्यास मराठा समाजाला आरक्षण – चंद्रकांत पाटील

Archana Banage
error: Content is protected !!