Tarun Bharat

संजय राऊत यांना खासदार-आमदारांना भेटण्यास जेल प्रशासनाची मनाई

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्राचाळ प्रकरणात अटकेत आहेत. सध्या संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. संजय राऊत यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे खासदार, आमदार कारागृहात गेले होते. मात्र, त्यांना भेटीची परवानगी नाकारण्यात आली. यामध्ये संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचाही समावेश आहे.

संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आलेल्या एका खासदार आणि दोन आमदारांना त्यांना भेटू देण्यात आले नाही. तुरुंग प्रशासनाने शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना भेटू दिले नाही. दरम्यान, राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संजय राऊत यांना भेटण्यासाठी १ खासदार आणि २ आमदार गेले होते. मात्र, ऑर्थर रोड कारागृह प्रशासनाने त्यांना भेटीची परवानगी नाकारली. नियमानुसार कोर्टाच्या परवानगीशिवाय रक्तातील नातेवाईक सोडून इतर कोणीही आरोपीला भेटू शकत नाही, असे तुरुंग प्रशासनाकडून शिवसेनेच्या खासदार, आमदारांना सांगण्यात आले.

हे ही वाचा : धनुष्यबाण चिन्हावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला; म्हणाले, …तर वेगळा पक्ष काढू शकता

संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांना सोडून इतरांना भेटीसाठी परवानगी घ्यावी लागेल असे सांगण्यात आले. सुनील राऊत यांनी तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांच्याकडे संजय राऊत यांना वायचळ यांच्या कार्यालयात भेटू द्यावे अशी विनंती केली. मात्र, सुनील राऊत यांची ही निनंती फेटाळण्यात आली. यावेळी इतर कैद्याप्रमाणे तुम्हाला कुटुंबीयांना कुटुंबातील सदस्यांना भेटला येईल, असे संजय राऊत यांना सांगण्यात आले.

error: Content is protected !!