कोल्हापूर: पडद्यामागचे राजकारण बंद करा, आमचं ठरलंय हे बाजूला ठेवून आमच्या शिवाय ठरणार नाही हे दाखवून द्या,आम्हाला डावलून काम कराल तर खुर्च्या हालवू.जे करायचे ते शिवसेनेला सोबत घेऊन करा. पैशाची मस्ती दाखवू नका. असा थेट इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला. ते प्रायव्हेट हायस्कुल येथे झालेल्या शिवसंपर्क मेळाव्यात ते बोलत होते.
तसेच आमचं ठरलंय त्यांनाच घरी पाठवायचं ठरवणार, ठाकरे यांचे राज्य आहे तोपर्यंत आता शिवसेनाच कोल्हापूरचे भविष्य ठरवणार. आमचं ठरवलंय म्हणाऱ्यांना वेळ प्रसंगी घरी बसवू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात अगोदर जिल्ह्यात सहा उमेदवार होते. फक्त मेळाव्यात ओरडून शिवसैनिक आहे,हे दाखवून देऊ नका. जे आमचे गेले ते परत मिळवण्याचा निश्चय करा. नरके साहेब आघाडी-बिघाडी नंतर बघू, आता लक्ष कोल्हापूर महापालिका निवडणुका मध्ये लक्ष घाला. असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
आता तीन खासदार आहेत, आता महापालिकेत चार नगरसेवकांवर थांबणाचं नाही. आमच्या शिवाय महापौर होऊ देणार नाही, अशी गर्जना राऊत यांनी केली.


previous post