Tarun Bharat

Sanjay Raut : संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; कोर्टाचा आदेश

Sanjay Raut Patrachal Land Scam : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना आज पुन्हा चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांना ईडीने 31 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर केलं असता त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ईडीने 10 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. पण संजय राऊत यांचे वकील अॅड. मनोज मोहिते जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. मात्र तरीही कोर्टाने 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Related Stories

जिल्ह्याचे राजकारण योग्य वळणावर – महादेवराव महाडिक

Abhijeet Khandekar

ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर

Archana Banage

‘ब्लू टिक’साठी मोदी सरकार भांडतंय मात्र लसीसाठी…? ; राहुल गांधींचे सूचक ट्वीट

Archana Banage

कोल्हापूर : पुढील विधानसभा स्वतंत्रपणे लढवून दाखवा

Archana Banage

रांगोळीत सहकारी संस्थेचे धान्य दुकान फोडले

Archana Banage

राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे

datta jadhav