Sanjay Raut : तीन महिन्यांनी हाताला घड्याळ बांधलंय.तुरुंगात घड्याळ घालण्यास परवानगी नसते.जगातल्या कोणत्याही तुरुंगात राहणं कठीण असतं.बाहेर आल्यावर लोकांनी स्वागत केलं,प्रेम दिलं.मला वाटलं लोकं मला विसरतील, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना आज दिली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल न्यायालयाने राऊतांना जामीन मंजूर केला.यानंतर तुरुंगातून बाहेर आलेल्या संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक केले.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, ज्या गोष्टी जनतेसाठी,राज्यासाठी चांगल्या आहेत त्याचं स्वागत करायला हवं. विरोधासाठी विरोध करणार नाही. शिंदे-फडणवीस सरकारने काही निर्णय चांगले घेतले.मी त्यांचे स्वागत करेन.देवेंद्र फडणवीस यांनी काही चांगले निर्णय घेतले.गरीबांसाठी घर देण्याचा निर्णय, म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय जो आमच्या सरकारने मागे घेतला होता तो फडणवीस यांनी घेतले ते चांगले वाटले.चांगल्या निर्णयांचे स्वागत व्हायला हवे असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. आज मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझे सरकारी काम आहे ते त्यांच्या अखत्यारित असलेल्या विभागात आहे.त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहे.मी अमित शहांना सांगेन की देशात काय होतं आणि माझ्यासोबत काय झाल असंही संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या लोकांनी षडयंत्र रचलं किंवा ईडीवर मी टीका करणार नाही.मला कुणाबद्दल तक्रार नाही करायची.जे भोगायचं ते आमच्या पक्षाने आणि कुटुंबाने भोगलं.सावरकर दहा वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात कसे राहिले.टिळक,अटल बिहारी वाजपेयी हे तुरुंगात कसे राहिले.राजकारणात असणाऱ्यांना कधी ना कधी तुरुंगात जावं लागतं असंही ते म्हणाले.


previous post
next post