Tarun Bharat

संभाजीराजे अपक्ष लढले तर पाठिंबा नाही-संजय राऊत

आॅनलाईन टीम/ तरूण भारत

मुंबई: शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही, मग तो कोणताही उमेदवार असो. राज्यसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढणार आहे. संभाजीराजे अपक्ष लढणार मात्र त्यांच्याकडे 42 मते आहेत का? आम्ही संभाजीराजेंच्या विरोधात नाही. मात्र अपक्ष लढणाऱ्यांना आमचा पाठिंबा नाही असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjya Raut) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांना आज मुख्यमत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवबंधवन बांधण्यासाठी बोलवले होते. मात्र संभाजीराजे अपक्ष लढणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संभाजीराजे यांच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी उत्तर दिले.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यसभेसाठी आमच्य़ाकडे दोन जागा आहेत. त्यामुळे त्या जागेवर दोन शिवसैनिक निवडून येतील. संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. आम्ही दोन्ही जागी उमेदवार देऊ आणि निवडून येऊ. जेव्हा एखादा उमेदवार असं सांगतो, तेव्हा त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केली असते. ज्याअर्थी त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये, त्याअर्थी त्यांना कोणीतरी पाठिंबा देत आहे हे स्पष्ट होतंय. अशावेळी आम्ही मध्ये पडणं योग्य नाही असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, त्यांच्याकडे मतं नाही, मग त्यांनी आमच्याकडे मागितली. आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडणून आणायचा आहे. आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग त्या ठिकाणी कोणीही असो. संभाजीराजेंना आम्ही सांगितलं तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल मागे येऊ. आता निर्णय त्यांचा आहे. उद्धव ठाकरेंच्या वतीने मी सांगतो ये उद्धवजी के मन की बात है.
शिवसेना राज्यसभेच्या दोन जागा लढणार हा अपराध नाही.आमच्या सोबत कोणाला यायचं असेल तर आम्ही विचार करू असेही त्यांना स्पष्ट केलं.

Related Stories

MPSC ची १५ हजार ५१५ पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता- अजित पवार

Archana Banage

हुंड्यासाठी छळ, बिजू जनता दलाच्या खासदाराविरोधात सुनेची तक्रार

Archana Banage

‘म्हैसूर’ येथे योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग

Rohit Salunke

अफगाणच्या शफाकवर सहा वर्षांची बंदी

Patil_p

नेर्ले येथे दोन ट्रकच्या अपघातात एक ठार

Archana Banage

अर्मेनिया-अझरबैजान लढाईत 23 ठार, 100 हून अधिक जखमी

datta jadhav