Tarun Bharat

‘या’ आमदारांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केलं नाही; संजय राऊतांनी जाहीर केली नावे

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दिवसभरातील नाट्यमय घडामोडीनंतर राज्यसभेच्या ६ जागांचा निकाल हाती आला. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (sanjy pawar) यांना पराभव पत्करावा लागला. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजार उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

बाजारातले घोडे जास्त बोली लागल्यानं विकले गेले
काही जे बाजारातले नेहमीचे घोडे असतात, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली, असं मला वाटतंय. इतर काही कारणं असतील. त्यामुळेच आमची साधारण सहा एक मतं होती, अपक्षांची ती आम्हाला मिळाली नाहीत. ते कोणाचेच नसतात, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अपक्ष आमदारांवर जोरदार हल्ला चढवलाय. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

बविआ आणि अपक्ष आमदारांनी मतदान केलं नाही
सहाव्या उमेदवारासाठी शिवसेनेनं जोरदार प्रयत्न केले असले, तरी महाविकास आघाडीकडच्या काही अपक्षांची मतं फुटली आणि शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. शिवसेना नेते संजय पवार यांनी तर शिवसेनंच्या उमेदवाराला मतदान न करणाऱ्या अपक्ष आमदारांची नावे जाहीर केली आहेत. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे आणि स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

अधिक वाचा: शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंचा तुकोबांच्या अभंगातून टोला

संजय राऊत यांनी या निवडणुकीत भाजपाने घोडेबाजार करत निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत शिवसेनेच्या उमेदवारला मतदान न केलेल्यांची नवे घेतली. यामध्ये बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय शिंदे आणि शामसुंदर शिंदे यांच्या नावांचा समावेश आहे.

Related Stories

बनावट दारू निर्मितीवर राज्य उत्पादनचा छापा

Patil_p

…तोच गांधींवरील चित्रपटाला न्याय देऊ शकेल

datta jadhav

तडीपार गुंडाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून

datta jadhav

सोलापूर : शिराळ येथे एकाचा खून, मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

Archana Banage

दूध दर वाढ आंदोलन : महायुतीच्या वतीने महादेवाला दुग्धाभिषेक

Archana Banage

नाना पटोले यांच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा स्वबळाचा नारा

Archana Banage
error: Content is protected !!