जे आमदार महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्या सर्व आमदारांनी 24 तासात मुंबईत परत यावं आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर अधीकृत मागणी मांडावी आम्ही विचार करु. तुमची इच्छा आणि भूमिका मांडा. जर बंडखोर आमदारांना मविआतून बाहेर पडायची इच्छा असेल तर शिवसेनेने बाहेर पडून वेगळा विचार केला पाहिजे. अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केली. मी हे हवेत बोलत नसून अधीकृत बोलत आहे असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, तुम्ही पक्के शिवसैनिक आहात. तुम्ही शिवसेना सोडायची नाही असे सांगत आहात. तुमची मागणी सरकार विषयी आहे. तीच मागणी सोशल मिडियाच्या माध्यमांतून न मांडता समोर या नक्कीच विचार केला जाईल असे मोठे वक्तव्य त्यांनी आज केले. तुम्ही घरला परत या याचा अर्थ सेना भाजपात जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा शेवटचा पर्याय म्हणून सेनेन मोठे पाऊल उचलले जात असल्याचेही बोलले जात आहे.

