Tarun Bharat

उध्दव ठाकरे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतील, येणारा काळ शिवसेनेचाचं- संजय राऊत


ऑनलाईन टीम/ तरुण भारत

देशातील चारही स्तंभांना वाळवी लागली आहे. न्यायालय न्यायासारखं वागलं तर शिवसेनेचाचं विजय होणार. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणालाही संपवता येणार नाही. सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर तर नाहीच. अशी अनेक आव्हान आली गेली शिवसेना डटके उभी राहिली आहे. विरोधकांनी शिवसेना फोडण्याचं पाप केलं आहे. बंडखोरांना महाराष्ट्र माफ करणार नाही. विरोधक शपथविधीसाठी तयारी करत आहेत. पण उध्दव ठाकरे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतील. महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक शिवसैनिक मुख्यमंत्री होईल. येणारा काळ शिवसेनेचाचं असणार अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना दिली. आज झालेल्या कॅबिनेट बैठकित मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. यानंतर कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी निरोपाचं भाषण केलं का असा प्रश्न उपस्थित केला जातोयं यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले मुख्यमंत्री
माझ्याच लोकांनी मला दगा दिला. त्यांनी दगा दिला म्हणून ही परिस्थिती उद्भवली आहे. तुम्ही जे सहकार्य केलंत त्याबद्दल धन्यवाद. कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाऊ. कुणी दुखावलं असेल तर माफी मागतो अशी भावना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली. आज मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्या खात्याचे विषय राहिले ते पुढच्या बैठकीत घेतले जातील असेही उध्दव ठाकरे म्हणाले. यावेळी काॅंग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काॅंग्रेस नेते काय म्हणाले

उध्दव ठाकरे हे असे व्यक्तीमत्व आहे जे कधी हारलेत ना कधी हारणार आहेत. त्यांनी कोरोनात खूप चांगल काम केलं आहे. खूप मोठ आॅपरेशन झाल्यानंतरही त्यांनी एका महिन्यात काम सुरु केलं याबद्दल सर्वांनीच त्यांच कौतुक केलं आहे. आमचा त्य़ांनी नेहमी पाठिंबा राहिल अशी प्रतिक्रिया काॅंग्रेसच्या मंत्र्यांनी दिली आहे.

Related Stories

“मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच कोरोना दुसऱ्या लाटेत…” – सोनिया गांधी

Archana Banage

उद्योजक अनिरूद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकरचा छापा

datta jadhav

विरोधी पक्षांकडून विकासकार्यात अडथळा

Patil_p

Sanjay Raut Press Conference Live: ‘किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना तातडीनं अटक करा’

Archana Banage

हुर्रियतच्या दोन्ही गटांवर बंदीची तयारी

Patil_p

आता सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाहा Live

Archana Banage