Tarun Bharat

वर्षा राऊतांची होणार ईडी चौकशी, ११ वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) ईडी कोठडीत आहेत. राऊत यांना न्यायालयाने ८ ऑगस्ट पर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली आहे. आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना आज चौकशीसाठी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती.

खासदार सजय राऊत यांना गुरुवारी कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीने कोठडी सुनावली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीने कोर्टात केला. ज्यांच्याशी व्यवहार झाला आहे. त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचे ईडीने पीएमएलए कोर्टाला सांगितले. दरम्यान 1 कोटी 17 लाखाच्या व्यवहाराबाबत तपास सुरु असून यापूर्वी १ कोटी ६ लाखांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्याचे ईडीने कोर्टात सांगितले. या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : सातारा- कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम दिवाळीला सुरू

ईडीचे संजय राऊतांवर हे आहेत आरोप
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. ही रक्कम आणखीही असू शकते, असे आरोप ईडीने कोर्टात केले आहेत.

Related Stories

मनसेचे वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर !

Abhijeet Shinde

सदरबाझारात पालिकेचा अजब कारभार

Patil_p

गोकुळ शिरगाव एस.टी.कॉलनीत आणखी तीन पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

मीडियाला कळते मग पोलिसांना का नाही : देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

मुंबईत डी कंपनीशी संबंधित 20 ठिकाणांवर NIA ची छापेमारी

datta jadhav

..अन् ते अतिक्रमीत शेड काढून घेण्याचा शेड मालकाचा उपनगराध्यक्षांना शब्द

Abhijeet Shinde
error: Content is protected !!