महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस वाढत आहे.दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. नुकतेच त्यांनी सोलापूरात कन्नड भवन बांधण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केला आहे, असे एका पत्रकार परिषदेत म्हटलं होत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोम्मई यांच्यावर टोला लगावलाय.
“हा देश अनेक राज्य एकत्र येऊन बनला आहे. देशात आता संस्थाने राहिली नसून, राज्य आहेत. महाराष्ट्राचे प्रत्येक राज्यांबरोबर आणि कर्नाटकशीही प्रेमाचे संबंध आहे. गुवाहाटीवरून आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आसाम भवन उभारण्याची घोषणा केली. तर, मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभे करणार असल्याचं सांगितलं आहे.”मुंबईत अनेक कानडी बांधवांचे भवन, हॉल्स आहेत. आमचा कर्नाटकशी वाद नाही. वाद ते निर्माण करत आहेत. जर इर्षेने सोलापूर आणि कोल्हापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यावी. बेळगाव आणि बेंगलोरला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा आहे. त्याबाबत निर्णय व्हावा,” असं राऊत यांनी बोम्मई याना आव्हान केलं आहे. ते नाशिक मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

