Tarun Bharat

Kolhapur: सीईओ चव्हाण यांची संभाव्य पुरबाधीत गावांना भेट

Advertisements

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बुधवारी संभाव्य पुरबधित गावांना भेट दिली. गतवर्षीच्या महापुरात सर्व प्रथम बाधित झालेल्या व यावर्षीही महापुराचा तडाखा बसू शकणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील वारणा नदीच्या काठी असलेल्या निलेवाडी,जुनेपारगांव,नवेपारगांव,चावरे व घुणकी या पुरग्रस्त गांवाना भेटी देऊन सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थांशी पुर्वतयारीच्या अनुषंगाने चर्चा केली. तसेच बाधित ठिकाणे,निवारागृहे व जनावरांच्या छावण्यांना भेट दिली.

सर्व गावांत पुराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी सांगितले.त्यामुळे सीईओ चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.तसेच योग्य वेळी सुरक्षित स्थळी जाण्याचे सर्वांना आवाहन केले.यावेळी स्थलांतरीत लोकसंख्या त्यांच्या निवाऱ्याची सोय, पाणी गुणवत्ता परीक्षण, टी.सी.एल साठा,मेडीक्लोर साठा,फॉगिंग मशीन फवारणीसाठी औषध साठा,निवारा केंद्रावर उपलब्ध केलेले साहित्य,ढिगारे उपसणेसाठी उपलब्ध जेसीबी,ट्रॅक्टर संख्या,खाजगी विंधन विहिरीची संख्या,पर्यायी स्मशान भुमीची उपलब्धता या बाबींच्या नियोजनासंदर्भात आढावा घेतला.

पुरपरिस्थितीत निवारागृहामध्ये स्थलांतरित नागरिकांच्या संख्येनुसार शौचालय संख्या निश्चित करावी त्यानुसार आवश्यक प्रमाणात ग्रामस्थांना विनंती करून शौचालय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी व्यक्तिगत व सार्वजनिक शौचालयांची यादी करून नियोजन करावे व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबून आपत्तीच्या काळात सतर्क राहवे आशा सुचना उपस्थितांना दिल्या.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) अरूण जाधव, गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, नायब तहसिलदार दिगंबर सानप , कार्यकारी अभियंता (बांधकाम), महेंद्र क्षीरसागर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Stories

आपल्या गुरुजीला शिक्षकांचा विरोध

Kalyani Amanagi

CRIME:MURDER:कोल्हापूर साळोखेनगरात तरुणाचा भोसकून खून

Rahul Gadkar

वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द न झाल्यास आंदोलन छेडू – लखू खरवत

Anuja Kudatarkar

गाव, वॉर्डनिहाय शिवसंपर्क अभियान राबवा; संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर

Archana Banage

केशरी शिधापत्रिकाधारकांनाही त्वरीत धान्य द्या – खासदार मंडलिक यांची मागणी

Archana Banage

मोटरसायकल अपघातात हिरवडे दुमाला येथील एकाचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!