प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई सेसायटी संचालित आरपीडी कॉलेजमध्ये हिंदी विभागातर्फे क्रांतिकारी समाज सुधारक संत महात्मा कबीरदास यांची 645 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदी विभागाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवाय संत कबीरदास यांच्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला.
प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी प्रा. एस. एस. शिंदे डॉ. एच. एच. पाटील, डॉ. एम. एस. कुरणी, प्रा. प्रसन्ना जोशी, डॉ. अभय पाटील, डॉ. रामकृष्ण एन., प्रा. पी. डी. गावडे आदी उपस्थित होते. आभार प्रा. विजयकुमार पाटील यांनी मानले.