छत्रपती शिवाजी क्लस्टर प्राथमिक क्रीडा स्पर्धा
बेळगावः ओरिएंटल इंग्रजी माध्यम शाळा आयोजित श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर विभागाच्या प्राथमिक मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या विविध सामन्यात संत मीरा, मुक्तांगण, जीजी चिटणीस, हेरवाडकर या शाळांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
टिळकवाडी येथील लेले मैदानावर सकाळी ज्ये÷ फुटबॉल पंच गोपाळ खांडे, ओरिएंटलच्या शिक्षिका सरिता नाईक, बापूसाहेब देसाई, प्रवीण पाटील या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जयसिंग धनाजी, देवकुमार मंगण्णाकर, अर्जुन भेकने, रामलिंग परीट, संतोष दळवी, कल्लाप्पा हगीदळी, अनिल मुगळीकर, स्वप्निल वाके, सी. आर. पाटील उपस्थित होते.
पहिल्या सामन्यात भारती विद्या भवनने प्लेझंट स्कूलचा 1-0, दुसऱया सामन्यात केएलएस शाळेने कर्नाटक दैवज्ञ संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1, तिसऱया सामन्यात मुक्तांगण शाळेने गजाननराव भातकांडे शाळेचा 1-0, चौथ्या सामन्यात एम व्ही हेरवाडकर शाळेने ओरिएंटल शाळेचा 1-0, पाचव्या सामन्यात जीजी चिटणीस शाळेने ज्ञानमंदिर शाळेचा 1-0, सहाव्या सामन्यात संत मीरा शाळेने व्ही एम शानभाग शाळेचा 3-0, सातव्या सामन्यात मुक्तांगण शाळेने भारती विद्या भवन शाळेचा 2-0 असा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.
आजचे उपांत्य सामने –मुक्तांगण वि. एमव्ही हेरवाडकर, सकाळी 9 वा., संत मीरा वि. जीजी चिटणीस, सकाळी 9.30 वा.