Tarun Bharat

संत मीराचे फुटबॉल संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींचे फुटबॉल संघ विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. केदारपुर ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान होणाऱया 33 व्या राष्ट्रीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेसाठी दक्षिणमध्य क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱया संत मीरा शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींचे संघ पात्र ठरले आहेत. तसेच 19 वर्षाखालील पदवीपूर्व कॉलेजच्या स्पर्धेसाठी खानापूर येथील शांतिनिकेतन पदवीपूर्व कॉलेजचा संघ पात्र ठरला आहे.

या संघाला हनुमान स्पोर्ट्सचे संचालक आनंद सोमण्णाचे, साईराज स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष महेश फगरे, विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, अस्मिता इंटरप्राईजेसचे संचालक राजेश लोहार यांनी संघाला क्रीडासाहित्य व गणवेष देऊन शुभेच्छा दिल्या तसेच विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, व पालक वर्गाने संघाला रवानापूर्वी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

गायरान जमीन स्मशानभूमीसाठी दिल्यास तीव्र आंदोलन छेडणार

Amit Kulkarni

आंतरराज्य बससेवा वारंवार विस्कळीत

Amit Kulkarni

प्रथमच सार्वजनिक गणेशमूर्तींचे रात्री दहापूर्वी विसर्जन

Patil_p

मतदारयादी विभाजनाचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

ऑटोरिक्षाचालकांच्या मनमानीची जिल्हाधिकाऱयांकडून गंभीर दखल

Amit Kulkarni

काटगाळीनजीक अपघातात दोन ठार

Tousif Mujawar