Tarun Bharat

संतोष करंडक स्पर्धेतील सामने आसाममध्ये

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आगामी 76 व्या वरिष्ठांच्या पुरुषांच्या राष्ट्रीय संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेतील गट 3 च्या सामन्यांचे यजमानपद आसाम भूषविणार आहे. सदर स्पर्धेतील गट 3 मधील हे सामने 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान होणार आहेत. या सामन्यांचे यजमानपद आसामला बहाल केल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे.

या स्पर्धेतील विविध तीन गटातील सामन्यांसाठी तीन विविध केंद्रांची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेतील गट 1 मधील सामने 23 ते 31 डिसेंबर दरम्यान दिल्लीत होणार आहेत. गट 2 आणि गट 5 मधील सामने 26 डिसेंबर 8 जानेवारी दरम्यान तसेच 24 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान अनुक्रमे कोजीकोडे आणि भुवनेश्वर येथे खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी अन्य दोन गटातील सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे लवकरच घोषित करण्यात येतील.

2022-23 ची संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा नव्या स्वरुपात होणार आहे. सदर स्पर्धेत 36 संघांचा समावेश असून ते सहा गटात विभागण्यात येतील. या सहा गटातील आघाडीचे सहा संघ तसेच दुसऱया स्थानावरील अव्वल तीन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. रेल्वे, सेनादल तसेच यजमान संघांना थेट प्रवेश देण्यात आला आहे.

गट 3 – गोवा, आसाम, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, नागालँड. 28 डिसेंबरला अरुणाचल प्रदेश वि. तामिळनाडू, उत्तरप्रदेश वि. नागालँड, आसाम वि. गोवा, 30 डिसेंबरला उत्तर प्रदेश वि. गोवा, नागालँड वि. तामिळनाडू, आसाम वि. अरुणाचल प्रदेश, 1 जानेवारीला उत्तर प्रदेश वि. तामिळनाडू, गोवा वि. अरुणाचल प्रदेश, नागालँड वि. आसाम, 3 जानेवारीला उत्तर प्रदेश वि. अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू वि. आसाम, गोवा वि. नागालँड, 5 जानेवारीला उत्तर प्रदेश वि. आसाम, अरुणाचल प्रदेश वि. नागालँड आणि तामिळनाडू वि. गोवा असे सामने होतील.

Related Stories

62 धावात 5 बळींसह अक्षरचा ‘गोल्डन रन’ कायम!

Patil_p

भारत-मलेशिया महिला क्रिकेट सामना आज

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा 16 जणांचा वनडे संघ जाहीर

Amit Kulkarni

चेन्नई सुपरकिंग्सच्या पथकातील 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

लेवान्डोवस्कीला फुटबॉल सामना हुकणार

Patil_p

पाटणा पायरेट्स यू मुम्बाला धक्का

Patil_p