Tarun Bharat

दोडामार्गात पोदार स्कुल सुरू करण्याची संतोष नानचे यांची मागणी

Advertisements

Santosh Nanche’s demand to start Podar School in Dodamarg

आमदार नितेश राणे यांच्याकडे केली मागणी

दोडामार्ग शहरासह आसपासच्या गावातील मुलांसाठी दोडामार्गात पोदार इंटरनॅशनल स्कूलची उभारणी करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्याकडे केली आहे. कणकवलीमध्ये सुरू केलेल्या पोदार स्कूलप्रमाणे दोडामार्गतही हे स्कूल सुरू करण्याची मागणी श्री. नानचे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

खुद्द दोडामार्ग शहर तसेच आसपासच्या गावातील बहुतांश मुले ही शिक्षणासाठी गोव्यात जातात. ते पाहता आरोग्य सुविधानंतर शिक्षणासाठीही येथील आपले लोक गोवा राज्यावर अवलंबून आहेत त्याची एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला खंत असल्याचे श्री.नानचे यांनी स्पष्ट केले आहे. ते लक्षात घेता या ठिकाणी चांगल्या दर्जाचे शिक्षण देणारे स्कूल उभे राहणे गरजेचे आहे. कणकवलीमध्ये ज्याप्रमाणे पोदार स्कूल सुरू करण्यात आले त्याचप्रमाणे दोडामार्गातही तसेच स्कूल उभे राहिल्यास येथील हुशार विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची सोय होईल असेही श्री. नानचे यांनी या निवेदनात म्हटले असून या संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी आमदार राणे यांच्याकडे केली आहे.

दोडामार्ग / वार्ताहर

Related Stories

लॉकडाऊनमध्ये महिलांवर अन्याय होतोय तर ‘वन स्टॉप सेंटर’ची मदत घ्या

Archana Banage

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी गाबित समाजाचे उपोषण सुरू

Anuja Kudatarkar

मच्छिमारीस अडथळा ठरणारे ब्रेकवॉटरचे चॅनल हटविणार -राऊत

Anuja Kudatarkar

पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा

Patil_p

बडतर्फीच्या कारवाईने एसटी कर्मचाऱयांमध्ये संताप

Patil_p

मराठी पत्रकार परिषदेचे शरद पवार यांना विविध प्रश्नी साकडे

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!