Tarun Bharat

ईश्वरप्पा यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कर्नाटकातील कंत्राटदार संतोष पाटील (santosh patil) यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा (ks eshwarappa) वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तर विरोधी पक्षाकडून ईश्वरप्पांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. ईश्वरप्पांच्या विरोधात रोष वाढत असताना अखेर शुक्रवारी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (basavaraj bommai) यांना सुपूर्द केला. शुक्रवारी ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पदाचा राजीनामा (resignation) सादर करणार असल्याचे सांगितले होते.

मंगळवारी कंत्राटदार संतोष पाटील यांचा मृतदेह उडुपी येथील लॉजमध्ये आढळून आला होता. त्यांनी विष प्राशन केल्याचा संशय आहे. आत्महत्येचे प्रकरण म्हणून पोलीस तपास करत आहेत. मृत्यूपूर्वी पाटील यांनी कर्नाटकातील भाजपा सरकार ईश्वरप्पा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर बेळगावीतील हिंडलगा येथे झालेल्या चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे पैसे न दिल्याचा आरोप केला होता. पैसे मिळवण्यासाठी ४० टक्के कमिशन मागितल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये, अशीही विनंती पाटील यांनी केली होती.

त्यानंतर शुक्रवारी ईश्वरप्पा हे आपल्या समर्थकांसह शिवमोगा येथून राजीनामा देण्यासाठी सकाळी बेंगळूरला रवाना झाले होते. पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या चौकशीनंतर ते निर्दोष सिद्ध होतील, असे ते म्हणाले. अखेर ईश्वरप्पा यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Related Stories

कोल्हापूर : ‘त्या’ डॉक्टरसह रिसेप्शनिस्टही कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

सीआयडी प्रमुखांनी घेतली अधिकाऱयांची बैठक

Omkar B

बिबट्याचे पुन्हा दर्शन..!

Rohit Salunke

राज्यात मंगळवारी पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

Archana Banage

वैशाली कुलकर्णी यांना पीएचडी

Patil_p

जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱयांचा पुन्हा मोर्चा

Amit Kulkarni