Tarun Bharat

संतोष करंडक फुटबॉल पंजाबचा पहिला विजय

Advertisements

मलप्पूरम: हिरो पुरस्कृत 75 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत बुधवारी येथे झालेल्या अ गटातील सामन्यात पंजाबने राजस्थानचा 4-0 अशा गोलफरकाने पराभव करत आपला पहिला विजय नोंदविला. दुसऱया एका अटीतटीच्या सामन्यात मेघालयने केरळची विजयी घोडदौड रोखत ही लढत 2-2 अशी बरोबरीत राखली.

अ गटातील झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या 36 मिनिटांच्या कालावधीत दर्जेदार खेळ केला पण 37 व्या मिनिटाला मानवीर सिंगने हेडरद्वारे दिलेल्या तिरकस फटक्यावर अमरप्रित सिंगने राजस्थानचा गोलरक्षक गजराजला हुलकावणी देत पंजाबचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत पंजाबने राजस्थानवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात पंजाबच्या खेळाडूंनी आपले पूर्ण वर्चस्व राखले. 63 व्या मिनिटाला मानवीर सिंग डाव्या बगलेतून आगेकूच करताना बॉक्स क्षेत्रात त्रिलोक लोहारने पाडवल्यामुळे पंजाब पेनल्टी मिळाली. त्यावर कर्णधार  परमजीत सिंगने पंजाबचा दुसरा गोल केला. पंजाब संघातील बदली खेळाडू तरूण स्लेथियाने शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन गोल नोंदवून राजस्थानचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.

Related Stories

दुसऱ्या सामन्यात भारताची इंग्लंडवर मात

Patil_p

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या संचालकपदी ग्रीम स्मिथ

Patil_p

महाराजा चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा 7 ऑगस्टपासून

Patil_p

लिव्हरकुसेनच्या विजयात हॅवर्ट्झचे दोन गोल

Patil_p

महिला हॉकीत नेदरलँड्सला चौथ्यांदा सुवर्ण

Patil_p

पाकच्या शदाब खानला दुखापत

Patil_p
error: Content is protected !!