Tarun Bharat

सांतईनेज येथे उद्या ‘सप्तसूर माझे’ कार्यक्रम

वार्ताहर /पणजी

सांतिनेज पणजी येथील श्री.वाटारेश्वर देवस्थानच्या मुर्ती प्रतिष्ठापना उत्सवानिमित्त मंगळवार 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वा.सांतिनेज येथील वाचनालयाजवळ उबारलेल्या रंगमंचावर ’निषाद क्रिएशन’ निर्मित ’सप्तसूर माझे’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते अशा बहुरंगी गीतांचा नजराणा, झी युवा वाहिनीवरील संगीत सम्राट कार्यक्रमात स्टार गायक ठरलेला मुंबई येथील अभिषेक काळे व कलर्स मराठी वाहिनीवरील ’सूर नवा ध्यास नवा ’ ची महाअंतिम फेरीची मानकरी,मुंबईची प्रज्ञा साने सादर करतील.कार्यक्रमात नेहा उपाध्ये हीचे निवेदन तर नितीन कोरगावकर(तबल),बाळकृष्ण मेस्त(सिंथेसायझर),अश्विन जाधव(ऑक्टोपड) व दत्तराज म्हाळशी(संवादिनी) यांची साथसंगत असेल.

अभिषेक नलावडे झी युवा संगीत सम्राट (पर्व दोन) मध्ये

नामवंत गायक आदर्श शिंदे यांच्याकडून ’स्टार गायक’ ही उपाधी प्राप्त केलेला व आकाशवाणीची बी उच्च श्रेणी प्राप्त अभिषेक नलावडे श्रीधर फडके व मिलिंद जोशी यांच्याकडे भावगीत गायनाचे शिक्षण घेत आहे. डॉ. रसिका फडके,समीर अभ्यंकर, गितेश दसक्कर यांच्याकडून त्याने शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले आहे. दोन किनारे दोघे आपण हा त्याचा अल्बम प्रसिद्ध झाला आहे. तो स्वतः उत्तम साऊंड रेकॉर्डिस्ट आहे. सोनिया परचुरे यांच्या हे नदी सरिते कार्यक्रमात तो प्रमुख गायक होता. त्याने हिंदुस्थानी व पाश्चात्त्य गान प्रकारात पुरस्कार पटकावले आहेत.

प्रज्ञा साने

कलर्स मराठी वाहिनीवरील ’सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील महाअंतिम फेरीची मानकरी प्रज्ञा साने हिने अखिल भारतीय गायन स्पर्धेत प्रथम येण्याचा मानही मिळवला आहे. तिने सौ. शुभदा पावगी व समीर अभ्यंकर यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे तर दीपाली महापात्रा यांच्याकडून सुगम संगीताचे शिक्षण घेतले आहे. तिची दोन गाणी युटय़?बवर गाजली आहेत. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर तिचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.

Related Stories

आता बेकायदा साईनबोर्ड, पोस्टर, बॅनर, होर्डिंग्सवर कारवाई

Amit Kulkarni

एसीजीएल कंपनीचे काम बेकायदेशीररित्या बंद

Patil_p

लईराईच्या जत्रोत्सवासाठी सोवळे व्रताला प्रारंभ.

Amit Kulkarni

काणकोण तालुक्यात उद्या ‘तिरंगा महोत्सवा’चे आयोजन

Omkar B

मडगाव अर्बंन बँकेच्या लॉकर धारकांना नोटिस

Amit Kulkarni

माशेल येथील देऊळवाडा परिवारांतर्फे भव्य नरकासुर प्रतिमा

Omkar B