Saree Draping Ideas : साडी वेअर करणे हे मला आवडत नाही अस म्हणणारी क्वचितच मुलगी किंवा महिला आपल्याला पाहायला मिळेल. कोणताही सण, समारंभ असल्यास साडी आणि त्याच्यावर ज्वेलरी कोणत्या प्रकारची वापरायची याविषयी वेगळे सांगण्य़ाचे गरज नाही . मात्र अशा अनेक साड्या आहेत ज्या नेसल्यावर आपण खूपच मोठे म्हणजेच वयाने मोठे दिसायला लागतो.पण काही छोट्या ट्रिक्स तुम्ही वापरुन साडी नेसण्याचा आनंद घेवू शकता.
साडी निवडताना या गोष्टी लक्षात घ्या
साडी नेसताना कोणता लुक तुम्ही करणार आहात यानुसार साडीची निवड करा. तुम्हाला जर महाराष्ट्रीय लुक करायचा असेल तर तुम्ही काठाच्या साड्याली पसंदी द्याल. मात्र मोठ्या काठाच्या साडीमध्ये तुम्ही खूपच एजेड दिसू शकता. यासाठी तुम्ही लहान काठाच्या साड्यांना पसंदी द्या. याशिवाय सिल्क, जॉजर, सॅटीन किंवा प्लेन साडी निवडू शकता. किंवा सिंपल प्रिन्ट असणारी साडी देखील नेसू शकता. यामुळे तुमचा लुक अजून खुलून दिसेल आणि तुम्ही यंग दिसाल.
ब्लाऊज निवडताना
कोणत्याही प्लेन साडीवर नेहमी प्रिंट असलेले ब्लाऊज वापरा. तसेच नेहमी मॅचिंग ब्लाऊज वापरण्यापेक्षा थोडा वेगळ्या कलरमध्ये ब्लाऊज वापरा. तुम्ही वेलवेटचे प्लेन किंवा प्रिंटेड ब्लाऊज देखील वापरु शकता.
ज्वेलरी निवडताना अशी घ्या काळजी
साडी वेअर केल्यानंतर ज्वेलरी निवडत असताना प्लेन साडी नेसणार असाल तर त्यावर थोडे लांब असे रिंग किंवा झुमके वापरु शकता. याशिवाय तुम्ही जर गळ्यामध्ये मोठे घातले असेल तर त्यावर अगदी छोटे कानातले वापरा. प्लेन साडीवर तुम्ही गळ्यात काही ही न घालता फक्त कानातले मोठे वापरु शकता.
लिपस्टिक निवडताना
साडी नेसल्यावर डार्क लिपस्टिकपेक्षा न्यूड किंवा लाईट लिपस्टिक शेडचा वापर करा. याचबरोबर न्यूड लिपस्टिकलीही वापरु शकता. त्यामुळे तुम्हाला रिचलुक मिळू शकतो.


previous post
next post