बेंदूरनिमित्त होतेय पूजा : यंत्रोपकरणामुळे बैलांची घटती संख्या चिंताजनक
प्रतिनिधी /बेळगाव
बळीराजाला शेतात मदत करणाऱया बैलाचे ऋण फेडण्यासाठी बेंदूर सणादिवशी बैलांची पारंपारिक पद्धतीने विशेष पूजा केली जाते. मात्र अलिकडे वाढत्या यंत्रोपकरणामुळे बैलांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. या परिस्थितीत बेंदूर सणानिमित्त शेतकऱयाच्या जोडीदाराचे (सर्जा-राजाचे) संवर्धन होणे काळाची गरज बनली आहे.
ग्रामीण भागात आजही बेंदूर सणाचे महत्त्व टिकून आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणात देखील बैलांचे कष्ट टिकून आहे. शेतकऱयाला जीवा-भावाप्रमाणे असणाऱया बैलांची संख्या जिल्हय़ात घटली आहे. जिह्यात 5,49,540 इतकी गाय, बैल व वासरांची संख्या आहे. त्यापैकी 1,09,908 इतके बैल आहेत. त्यामध्ये वासरांचा देखील समावेश आहे.
बैल हद्दपार होण्याची चिंता
बेंदूर सणाला बैलांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. यादिवशी कामाच्या बैलांना विश्रांती देऊन रंग व झूल घालून सजविले जाते. आजही काही गावात ही परंपरा जपली गेली आहे. बदलत्या काळाच्या ओघात शेतीचे तुकडे झाल्याने शेतकऱयांना बैलजोडी पाळणे अशक्मय झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही गावात हातावर मोजण्या इतक्याच बैलजोडय़ा शिल्लक राहिल्या आहेत. परिणामी येत्या काळात काही गावातून बैल हद्दपार होण्याची चिंता आता व्यक्त होत आहे. पूर्वी दावणीला बैलजोडी असणे म्हणजे फार प्रति÷sचे मानले जात होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱयांच्या दावणीला बैलजोडी दिसायची. मात्र काळाच्या ओघात शेतीचे झालेले आधुनिकीकरण आणि वाढत्या यंत्रोपकरणामुळे बैलांची संख्या घटली आहे. शिवाय मध्यंतरी बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्याने त्याचाही फटका बसला.
शेतीसाठी बैलजोडी आवश्यक
अलिकडच्या 10 वर्षात बैलजोडय़ांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र शेती व्यवस्थित कसण्यासाठी बैलजोडी आवश्यक आहे. बैलजोडीशिवाय शेती करणे अशक्मय आहे. शेतकऱयाला शेतीत मदत करणाऱया बैलांचे बेंदूर दिवशी विशेष पूजा करून ऋण फेडले जाते.
– इंद्रजित कलखांबकर (बैलजोडीमालक-चलवेनहट्टी)
वासरांच्या संगोपनासाठी प्रयत्नशील
बेळगाव जिल्हय़ात गाय, म्हैस व पाळीव जनावरांबरोबर बैलाची संख्याही टिकून आहे. पशुसंगोपन खात्यातर्फे लहान वासरांचे संगोपन व्हावे, यासाठी वासरू प्रदर्शन आणि इतर कार्यक्रम राबविले जात आहेत. जिल्हय़ात शेतीत काम करणाऱया आणि शर्यतीत धावणाऱया बैलांची संख्या मोठय़ा प्रमाणात
आहे.
– डॉ. राजीव कुलेर (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)