Tarun Bharat

दंतेवाडात नक्षलींकडून सरपंचाच्या पतीची हत्या

मृतदेह गावात फेकून दिल्याने खळबळ

दंतेवाडा / वृत्तसंस्था

छत्तिसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी शनिवारी महिला सरपंचाच्या पतीची गळा चिरून हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह गावातच फेकून नक्षलवादी जंगलभागात फरार झाले. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नक्षलवाद्यांच्या मलंगर विभाग कमिटीने ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. ही हत्या नक्षलवाद्यांनी केली आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलीस अधिकाऱयांचे म्हणणे आहे.

अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरपंचाच्या पतीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. मलंगर विभाग कमिटीचे पाच ते सहा सशस्त्र नक्षलवादी शुक्रवारी रात्री उशिरा रेवली गावात पोहोचले होते. महिला सरपंचाचा पती भीमा बारसे यांना घराबाहेर काढत त्यांनी त्याला जंगलाच्या दिशेने नेले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास मृतदेह गावातच फेकून देण्यात आला. दुसऱया दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी गावातील लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

हत्येच्या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त सुरक्षा जवानांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. गावकऱयाच्या हत्येची माहिती मिळाली आहे, मात्र ही घटना नक्षलवाद्यांनी केली की अन्य कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा प्राथमिक तपास सुरू असून चौकशीअंतीच नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे  दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले.

Related Stories

विझिंजम बंदर हिंसेसंबंधी विधानसभेत होणार चर्चा

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाचे मोबाईल ऍप सुरू

Patil_p

ज्योतिरादित्य सिंधिया यांना रेल्वेमंत्रिपद?

Patil_p

‘स्पुतनिक लाइट’ उतरणार मैदानात

datta jadhav

खासदारांच्या सुविधेकरता एअरलाइन कंपन्यांना पत्र

Patil_p

आता विमानप्रवासही 12.5 टक्क्यांनी महाग

Patil_p