Tarun Bharat

सरवानकडून निवड सदस्यपदाचा राजीनामा

वृत्तसंस्था/ सेंट जोन्स (ऍटीग्वा)

विंडीजचा माजी कसोटी क्रिकेटपटू तसेच निवड समिती सदस्य रामनरेश सरवानने आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती क्रिकेट विंडीजने दिली आहे. विंडीजच्या राष्ट्रीय पुरूष तसेच युवा निवड समिती सदस्य म्हणून सरवानने आपली भूमिका बजावली होती. काही वैयक्तिक समस्यामुळे सरवानने निवड समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला असल्याचे क्रिकेट विंडीजच्या प्रवक्त्याने सांगितले.

6 जानेवारी 2022 रोजी रामनरेश सरवानची विंडीजच्या क्रिकेट निवड समिती सदस्यपदी तसेच युवा निवड समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. आता सरवानच्या जागी माजी क्रिकेटपटू रॉबर्ट हेन्सची हंगामी नियुक्ती करण्यात आली आहे. रॉबर्ट हेन्स वेंडीजच्या युवा निवड समिती पॅनेलमध्ये विद्यमान प्रमुख सदस्य असून तो विंडीज निवड समितीचा माजी हंगामी चेअरमनही होता. विंडीजच्या क्रिकेट निवड समितीमध्ये डेस्माँड हेन्स हे सदस्य असून फिल सिमॉन्स प्रमुख प्रशिक्षक आहेत. क्रिकेट विंडीजचे संचालक जिमी ऍडॅम्स यांनी रामनरेश सरवानच्या विंडीज क्रिकेट क्षेत्रातील योगदानाबद्दल आभार मानले आहेत. विंडीजचा क्रिकेट संघ सध्या हॉलंडच्या दौऱयावर असून उभय संघात पहिल्यांदाच वनडे मालिका खेळविली जाणार आहे.

Related Stories

संदेश झिंगनचा एटीके-बगानशी नवा करार

Patil_p

इंग्लडचा न्यूझीलंडवर 20 धावांनी विजय

Patil_p

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा डिस्ने स्टारबरोबर करार

Patil_p

क्लिस्टर्सचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त

Patil_p

आगामी प्रो लिग हॉकी पात्रतेसाठी कर्णधार सविताचे

Patil_p

क्रीडा पुरस्कार वितरणावरही कोरोनाचे सावट

Patil_p