वृत्तसंस्था/ बेंगळूर
कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे येथे सुरू झालेल्या प्रतिष्टेच्या इटीपी चॅलेंजर बेंगळूर खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या मुकुंद शशीकुमार ाअणि प्रजनीश गुणेश्वरन यांनी पात्र फेरीमध्ये विजयी सलामी दिली.
एटीपीच्या मानांकन यादीत 402 व्या स्थानावर असलेल्या 26 वषीय मुकुंद शशीकुमारने अँड्रय़ू पॉलसनचा 6-1, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. दुसऱया एका सामन्यात प्रजनीश गुणेश्वरने झिम्बाब्वेच्या बेंजामीन लॉकवर 7-5, 6-4 अशी मात केली. अन्य एका सामन्यात भारताच्या रामकुमार रामनाथनला जपानच्या युचीमायाकडून पराभव पत्करावा लागला. तीन सेट्समधील झालेल्या या लढतीत जपानच्या युचीमायाने रामकुमार रामनाथनचा 3-6, 7-5, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत वाईल्ड कार्ड प्राप्त केलेल्या भारताच्या सिद्धार्थ रावत, के. त्यागी, दिग्विजय प्रतापसिंग आणि मनीष गणेश यांना मात्र प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला.