जम्मू
सत शर्मा यांना जम्मू-काश्मीर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना हे निवडणूक लढविणार असल्याने शर्मा यांना ही जबाबदारी मिळाली आहे. याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांना प्रदेश निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चौधरी सुखनंदन यांना उपाध्यक्ष तर कविंद्र गुपत यांना निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.