Tarun Bharat

Satara : विसावा नाका येथील दुकान आगीत भस्मसात; दुसऱ्या दुकानाला झळ

अग्निशमन विभागाची तत्परता

Advertisements

सातारा प्रतिनिधी

येथील विसावा नाका परिसरात बुधवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून एक दुकान आगीत भस्मसात झाले तर दुसऱ्या दुकानाला झळ लागली. आगीची माहिती अग्निशमन दलास मिळताच घटनास्थळी पोहचून तत्परता दाखवण्याने काही वेळात आग आटोक्यात आणली.

सातारा शहरातील विसावा नाका परिसरात बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक श्रीराम सेल्स या दुकानातून धुराचे लोट काही नागरिकांना दिसले. त्यातील जाधव यांनी लगेच अग्निशमन विभागाला फोन करून आगीची माहिती दिली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाचे पथक बंब घेऊन पोहचले मात्र,दुकानाचे शटर डाऊन असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अडथळा येत होता. कुलूप तोडून आत मध्ये अग्निशमन दलाचे कर्मचारी जाऊन आतून पाणी मारून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीमध्ये दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. बाजूच्या एका दुकानाला झळ पोहचली असून ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून नुकसानीची माहिती समजू शकली नाही.

Related Stories

सातारा : मृत्यूदर वाढताच : ३४ बाधितांचा मृत्यू

Abhijeet Shinde

जिल्ह्यातील 2089 शिक्षकांना वेतनश्रेणी

datta jadhav

…अन् स्टेट बँकेचा सेवा क्रमांकही निघाला फेक

datta jadhav

सातारा : …अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये भटकी कुत्री सोडू

datta jadhav

पुणे पदवीधरसाठी रयत क्रांतीतून डॉ. चौगुले यांना उमेदवारी

Abhijeet Shinde

जम्बो हॉस्पिटलची इमारत परत द्या; पुरातत्व विभागाची मागणी

datta jadhav
error: Content is protected !!