प्रतिनिधी-नागठाणे
Satara Crime : नागठाणे (ता.सातारा) येथे नागठाणे ते सासपडे रस्त्यानजीक असलेले बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी जिलेटिनच्या साहाय्याने ब्लास्ट करून फोडले.भरवस्तीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.चोरट्यानी येथून लाखोंची रोकड लंपास केली असल्याचा संशय घटनास्थळावरून व्यक्त होत आहे.अज्ञात चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
बुधवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास चोरट्याने बॅं क ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून प्रथम सीसीटीव्ही वर स्प्रे मारून सीसीटीव्ही बंद केले.त्यानंतर जिलेटीन कांडयांच्या साहाय्याने एका मशीनमध्ये स्फोट करून त्यातील रोकड लंपास करण्यात तो यशस्वी झाला.स्फोटाच्या आवाजाने परिसर चांगलाच हादरला गेला.घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि चेतन मछले,पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर व कर्मचाऱ्यांनी धाव घेत तपासाला सुरवात केली आहे. मशिनमधून लाखो रुपये चोरीला गेले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.


previous post