साताऱ्यात तब्बल पाच टन प्लास्टिक जप्त
प्रतिनिधी/सातारा
धार्मिक उत्सव साजरे करताना नैसर्गिक जलस्रोतांच्या गुणवत्तेवर व पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यास प्रोत्साहित करणे यासाठी जिल्हाधिकारी यांनी पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर एकल वापर प्लास्टीकवर ही बंदी करण्यात आली. त्याअनुषंगाने शहरात प्लास्टीक वापणाऱयांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेच्या कर्मचाऱयांनी सातारा शहरातुन तब्बल 5 टन प्लास्टीक जप्त केला आहे.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 31 ऑगस्टपर्यंत सातारा जिल्हय़ातील विक्रीसाठी तयार असणाऱ्या पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती वितरण व विक्री करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उत्पादन करण्यास दि. 9 जुलै पासून बंदी घालण्यात आलेली आहे. दि. 1 सप्टेंबर पासून सातारा जिल्हयामध्ये पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मूर्ती बनविणे, आयात करणे, वितरण करणे, खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे. याची सर्व मूर्तीकार व मूर्ती विक्रेते यांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱयांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
याचबरोबर एकल वापर प्लास्टिक वापरास बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्मोकोल उत्पादने (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवण) अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये प्लास्टिक वापराबाबत नियमन करण्यात आलेले आहे. तसेच एकेरी वापराचे प्लास्टिक (सिंगल युज) दूर/नष्ट/प्रतिबंधित करण्यात आलेले आहे.
हे ही वाचा : सराईत दुचाकी चोरट्य़ास शहर पोलिसांनी केले जेरबंद
शासनाने प्लास्टिक साहित्यांची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी केली आहे. यामध्ये आईक्रीम कांडय़ा, प्लेटस, कप, ग्लासेस, कटलरी-जसे काटे चम्मच, चाकू स्टॉ, ट्रे, 100 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणाऱ्या पिशव्या वगळता सर्व कंपोस्टेबल प्लास्टिक पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग). डिश, बाऊल, कंटेनर (डबे), सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल), मिळाचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका व सिगारेटची पाकिटे यावरील प्लास्टिक आवरण. प्लास्टिकच्या कांडय़ासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणाऱया प्लास्टिक कांडय़ा, प्लास्टिकचे झेंडे, पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे असणे बंधनकारक आहे. पालिकेच्यावतीनेही प्लास्टीक पिशव्यांचा वापर करण्यात येणाऱया दुकानांवर कारवाई करून, संबंधित प्लास्टीक जप्त करून त्यांना दंड ठोठाविण्यात आला आहे.
तब्बल 5 टन प्लास्टीक जप्त
दि. 1 जुलै पासुन सर्वत्र एकल वापर प्लास्टीक बंदीचा कायदा लागु करण्यात आला. त्याअनुषंगाने पालिकेच्यावतीने पुर्वसुना देऊनही अनेक दुकानदारांतर्फे राजरोसपणे प्लास्टीकचा वापर करण्यात येत होता. या दुकानदारांवर कारवाई करून आज (केवळ 20 दिवसात) पर्यंत पालिका कर्मचाऱयांच्यावतीने जवळपास केवळ साताऱयात तब्बल पाच टन इतके प्लास्टीक जप्त करून जवळपास 80 दुकानांवर कारवाई करण्यात आली. संबंधित दुकानदारांना प्रत्येकी 5 हजारा पर्यंतचा दंड ही ठोठाविण्यात आला आहे.