फलटण / प्रतिनिधी
येथील महसुल विभागाच्या रेकॉर्ड कार्यालयातील अव्वल कारकुन व त्याचा एक खाजगी साथीदार अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडुन फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महसुल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलगुडेवाडी (ता. फलटण) येथील तक्रारदाराने आपल्या घराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने सदरचा रस्ता मिळण्यासाठी आवश्यक लागणाऱ्या कागदपत्राची मागणी रेकॉर्ड कार्यलयातील अव्वल कारकुन पी.एन. जाधव ( रा. फलटण ) यांचेकडे केली होती. दरम्यान जाधव यांनी तक्रारदाराकडे २००० रुपयांची मागणी केली होती. मात्र या मागणीची तक्रार सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली होती.
दि. २० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधिअक सुरज गुरव, पर्यवेक्षण आधिकारी सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपती प्रतिबंधक विभाग साताराचे पोलिस निरी क्षक सचिन राऊत , विक्रम पवार पोलिस नाईक विनोद राजे , संभाजी काटकर यां या पथकाने पांडुरंग नामदेव जाधव व त्याचा खाजगी साथीदार सपकाळ दोन हजार रूपये घेताना रंगेहात पकडले. ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून तक्रार नसल्याचे प्रातिज्ञा पत्र करून देण्यासाठी जाधव यांनी पैशाची मागणी केली होती. या प्रकरणी जाधव व सपकाळ यांचे विरूध्द येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे