प्रतिनिधी / सातारा :
शहरातील विविध भागात पैसे गोळा करत फिरणाऱ्या फिरस्त्या विवाहितेवर शनिवारी चौघांनी सामूहिक अत्याचार केला. या चौघांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. साताऱ्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेला दोन दिवस झाले असून ही पाचवी घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिरस्ती विवाहिता ही आपल्या मुलीसोबत पैसे गोळा करण्याचे काम करत होती. दि. 23 रोजी 5 वाजण्याच्या सुमारास नम्या यंत्र्या भोसले(रा. फडतरवाडी ता. सातारा), किरडेट आशीर्वाद पवार(रा. गोगावलेवाडी ता. कोरेगाव), भगत काप्या काळे (बारटक्के चौक, सातारा), मयुर नागेश काळे(रा. फडतरवाडी ता. सातारा) यांना विवाहिता आपल्या मुलीसोबत फिरताना दिसली. यावेळी तुला व तुझ्या मुलीला घरी सोडतो असे म्हणत नम्या व किरडेट यांनी दोघांनी त्यांना गाडीवर बसवले. शहरतून गाडी निर्जनस्थळी नेली. तिथे दोघींना उतरवून एका झाडाखाली विवाहितेवर अत्याचार करायला सुरूवात केली. यावेळी भगत व मयुर यांनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यामुळे विवाहितेने यांची माहिती घरातील सदस्यांना देताच सर्वांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या विवाहितेने चौघांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात अत्याचार व विनयभंग कलामअतंर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नम्या भोसले याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर तीन संशयित फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.