नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : डोंगर पोखरून अनाधिकृत उत्खनन व बांधकामामुळेच जमिनींना व डोंगराला भेगा पडसल्याची शक्यता
वार्ताहर/पांचगणी
दांडेघर (ता. महाबळेश्वर) येथील ब्लूमिंग डेल हायस्कूलचे वरच्या बाजूच्या डोंगराला मोठमोठय़ा भेगा पडल्याने या ठिकाणी असणाया शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. आज सायंकाळी महसूल विभागाने पंचनामा केला असून त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे असे आदेश तातडीने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की पांचगणी पासून केवळ एक किलोमीटर वर असणाया दांडेघर हद्दीत असणाया ब्लुमिंग डेल हायस्कूल इमारतीच्या वरच्या बाजूला असणारा सर्व्हे नंबर 23 / 6 हा डोंगर आज अतिवृष्टीने सुमारे अडीच फूट खाली खचला असून डोंगराला सुमारे अर्धा ते एक फुटाच्या भेगा पडल्याने या शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे.
दांडेकर परिसरात अनेक ठिकाणी डोंगराच्या लगतच मोठमोठे उत्खनन व बांधकाम झाल्याने काही ठिकाणी मुसळधार पावसाने डोंगर सुटण्याच्या अवस्थेत आहेत दांडेकर परिसरात स्थानिक महसूल यंत्रणा अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळेच व अनाधिकृत उत्खननावर कुठेही कारवाई करत नसल्याने अनेक ठिकाणी मोठमोठाल्या डोंगर पोखरून बांधकाम करण्यात आली आहेत त्यामुळे आता या विभागातील सर्वच अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करून सध्या सुरू असणारे बांधकाम थांबवण्यात यावीत अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.
आज सायंकाळी तलाठी दीपक पाटील, निलेश गीते, उपसरपंच जनार्दन कळंबे, अशोक कासूर्डे यांचे उपस्थितीत हा पंचनामा केला. यावेळी येथील परीस्थीतीची पाहणी करून महसूल विभागाच्या अधिकायांनी धोकादायक क्षेत्रात असणाया शाळेच्या इमारतीला धोका असल्याने अधिकायांनी शाळेतील मुलांना तातडीने इतरत्र हलविण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पांचगणी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे जमीन खचण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
आज दांडेघर येथील डोंगर पावसाने खचला असल्याचे उपसरपंच जनार्दन कळंबे यांच्या निदर्शनास आल्याने आज सर्वांना बोलावून पंचनामा केला आहे. या भेगांमुळे शाळेच्या लागत असणारी दरड पाण्याच्या टाक्या जवळ आली आहे. तर एक वृक्ष ही यामध्ये उन्मळून पडला आहे.