खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा मराठी पत्रकार आणि डिजिटल मीडिया परिषदेची अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
सातारा प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील नागठाणे गावातील ग्रामीण पत्रकार संभाजी चव्हाण यांच्या आत्महत्यास कारणीभूत असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया आणि सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना खा.उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे,ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण,डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, सचिव पद्माकर सोळवंडे, खजिनदार, प्रशांत जगताप, शहराध्यक्ष प्रतीक भद्रे, शहर सचिव गुरुनाथ जाधव, शहर खजिनदार अमोल निकम, प्रमोद इंगळे, शुभम गुजर, तबरेज बागवान तसेच नागठाण्यातील सर्व ग्रामीण पत्रकार संघाचे प्रमुख पदाधिकारी व पत्रकार कै संभाजी चव्हाण यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थिती होते.
जोवर पत्रकार संभाजी चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक केली जात नाही तोवर सातारा जिल्ह्यातील पत्रकार शांत बसणार नाहीत असा इशारा राज्य उपाध्यक्ष शरद काटकर सातारा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पोलीस प्रशासनाला दिला. सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ या घटनेची दखल घेऊन संबंधित गुन्हेगारांवर कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील या सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना केली आहे