लोणंद/प्रतिनिधी
तांबवे (ता. फलटण) गावच्या हद्दीत मोटर सायकल व अज्ञात वाहन यांच्या झालेल्या अपघातात ऋषिकेश प्रमोद कानडे (वय 25 रा. लोणंद, ता. खंडाळा) याचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबवे (ता. फलटण) गावच्या हद्दीत दुपारी चारच्या सुमारास मोटरसायकलस्वार ऋषिकेश प्रमोद कानडे हे स्प्लेंडर मोटर सायकल नंबर एम. एच. 11 सीपी 9537 वरून मेजर ढाबा येथून इलेक्ट्रिशियन चे काम करून सातारा बाजूकडून लोणंद दिशेकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकल ला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या घटनेची फिर्याद गणेश कानडे यांनी पोलिसात दिली आहे त्या अज्ञात वाहनाचे पोलिसांकडून शोधाशोध सुरू आहे.