कराड प्रतिनिधी
वनवासमाची ता. कराड येथे सापडलेल्या तीन बिबट्यांच्या पिलांना पैकी काल रात्री मादी बिबट्या येऊन त्याच्या एका पिलाला घेऊन गेली. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , वनपाल सागर कुंभार , वनरक्षक दीपाली अवघडे, अभिजीत, व स्थानिक रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, योगेश शिंगण तसेच रेस्क्यू चे श्रीनाथ चव्हाण , हर्षद व डॉ कल्याणी ह्यांनी सर्व पिलू हे सुस्थितीत असल्याची खात्री केली, व सापडलेल्या ठिकाणी उसाच्या रानात पुन्हा एका क्रेट मध्ये ठेवली. पिलांचे मूत्र हे रानात विविद ठिकाणी मादी ला पिलांचा वास यावा म्हणून शिंपडले.
रात्री सुमारे 3 वाजता मादी येऊन एका पिलास घेऊन गेली आहे. राहिलेले दोन पिलू हे वन विभागाच्या ताब्यात सुरक्षित सुस्थितीत आहेत. बिबट्याची मादी (आई) पिलांपासून ताटातूट झाल्यामुळे रागीट(अग्रेसीव aggressive) होऊ नये म्हणून आज रात्री पुन्हा त्या दोन पिलांचे आई सोबत मिलन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.