Tarun Bharat

Satara; अखेर बेपत्ता शाळकरी मुलगा पंजाबमधे आढळला

कराडच्या अल्पवयीन मुलाचा मिरारोड पोलिसांनी लावला शोध

Advertisements

कराड / प्रतिनिधी

कराड तालुक्यातील पाडळी गावचा अल्पवयीन शाळकरी मुलगा ठाण्याच्या मिरारोड परिसरातून जून महिन्यात बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. मिरारोड पोलिस ठाण्याच्या पोलीस अधिकारी स्नेहल तांबडे यांच्या पथकाने गेल्याच आठवड्यात कराड परिसरात यासंदर्भात चौकशी केली होती. दरम्यान मिरारोडच्या पोलीस अधिकारी स्नेहल तांबडे, पोलीस उपनिरिक्षक वंजारी यांच्या पथकाने पंजाब येथे जाऊन चार दिवसात बेपत्ता मुलाचा शोध लावला. त्याला ताब्यात घेऊन सध्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

कराड तालुक्यातील पाडळी येथील शाळकरी मुलगा साईनाथ चव्हाण हा जून महिन्यात मिरारोड येथे नातेवाईकांकडे गेला होता. तेथून तो अचानक बेपत्ता झाला होता. हे प्रकरण मिरारोड पोलिसांनी अत्यंत गांभिर्याने घेत सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त अमित काळे, पोलीस निरिक्षक विजयसिंग बागल यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोडच्या पोलीस उपनिरिक्षक स्नेहल तांबडे या कराडला तपासासाठी आल्या होत्या. त्यांनी कराड शहर व ग्रामिण पोलिसांच्या मदतीने त्यांनी मुलगा नेमका कोठे गेला असावा? तो कोणाच्या संपर्कात होता? याची चौकशी करून अनेकांचे जबाब घेतले होते. यावेळी पोलिसांच्या हाती काही माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक स्नेहल तांबडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक वंजारी, कॉन्स्टेबल पवार, कॉन्स्टेबल हर्णे, कॉन्स्टेबल चकोर यांचे पथक गेल्या आठवड्यात पंजाबला रवाना झाले. पंजाबच्या अमृतसर, गुरूदासपूर भागात शाळकरी मुलाचा कसून शोध घेत पोलिसांनी पंजाबमधील काही संस्थांशीही संपर्क साधला. चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेला मुलगा पोलिसांच्या हाताला लागला. मिरारोड पोलिसांनी पंजाबला जाऊन केलेल्या अथक तपासाचे वरिष्ठांनी कौतूक केले. मुलाच्या नातेवाईकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

Related Stories

शेती पंप व दुचाकी चोरी प्रकरणी एकास अटक

datta jadhav

सातारा : मसूरच्या तलाठयासह त्याच्या स्वीय सहाय्यकास 2 हजारांची लाच स्वीकारताना अटक

Abhijeet Shinde

महाराष्ट्र केसरीचा आखाडा सातारला रंगणार!

datta jadhav

आता अनिल परब यांचा नंबर…; सोमय्यांचे नवे ट्विट

datta jadhav

सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत

prashant_c

शिवाजी विद्यापीठात संभाजी महाराज संशोधन केंद्र करा

Patil_p
error: Content is protected !!