Tarun Bharat

Sangli : हवेत फायरिंग करून दहशत माजवणार्यास अटक

कोकरुड वार्ताहर

आटूगड़ेवाडी मेणी ता.शिराळा येथील हॉटेल मधे जाताना आनंद शंकर पाटील यांना धक्का लागला म्हणून त्यांनी हवेत चार गोळ्या झाडल्याच्या कारणावरुन कोकरूड पोलिसांनी त्यांना अटक केली असून फिर्याद जयेश जयवंत निकम यांनी दिली आहे.


घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,ऊंडाळे (ता. कराड ) येथील जयेश जयवंत निकम (वय 26) हे आपल्या मित्रा सोबत आटूगड़ेवाडी (मेणी ता. शिराळा) येथील खिंडित असणाऱ्या हॉटेल भाऊचा ढाबा या ठिकाणी रात्री जेवायला आले होते.त्याच वेळी बबन उर्फ आनंद शंकर पाटील (रा. शिराळे वारुण ता. शाहुवाडी) हे जेवण करण्यासाठी आले होते.ढाब्याच्या दरवाजा तुन जात असताना फिर्यादि जयेश निकम याचा आरोपी बबन पाटील यास धक्का लागल्याने दोन्ही गटातील प्रथम शाब्दिक चकमक, झटापट झाली.यावेळी पाटील बबन पाटील यांनी खिशातील काळ्या रंगाचे पिस्टल काढून चार गोळ्या हवेत झाडून दहशत निर्माण करीत धमकी दिली.याबाबत ची फिर्याद जयेश जयवंत निकम यांनी कोकरुड पोलिसात दिली असून आरोपी बबन पाटील यास चार पुंगळ्या सह अटक केली आहे.अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टबल शिवाजी जाधव करत आहे.

Related Stories

उचगाव रेल्वे पुलावर चोरट्यांकडून व्यापाऱ्यांचे दीड लाख लंपास

Archana Banage

सातारा : मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Archana Banage

‘आविष्कार’चा शनिवारी 18 वा संगीत महोत्सव

Archana Banage

डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्या बंधूंचे निधन

Archana Banage

म्हैसाळ रस्त्यावर डंपरच्या धडकेत डॉक्टर ठार

Archana Banage

देशाच्या संरक्षणासाठी बलिदानास सज्ज व्हा.. -अण्णा डांगे

Tousif Mujawar