Tarun Bharat

Satara; जिल्हय़ाला जोरदार पावसाने झोडपले

सातारा / प्रतिनिधी

संपुर्ण जिल्हय़ालाच मंगळवारी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. सायंकाळच्या सुमारास या जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेती-पिकांबरोबरच अनेक व्यापारी वर्गांचे ही तितकेच नुकसान झाले. जोरदार पावसासह विजांच्या गडगटांमुळे अनेक ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा ही विस्कळीत झाला होता. जवळ दिडी ते दोन तास पावसाचा जोर हा कायम होता. हवामान खात्याने यापुर्वीच परतीच्या पासाचे संकेत दिले होते, त्यामुळे पुढील काही दिवस ही असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी तासंतास तुंबुन राहिले होते. तसेच नुकतेच पालिकेच्यावतीन उत्सवानिमित्त डांबरीकरण करून खड्डे बुजविण्यात आले होते. जोरदार पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणचे खड्डे जैसे थे निर्माण झाले आहेत. अनेकांनी छत्री, रेणकोट सारखे पावसाळी साहित्य न आणल्याने मिळेल त्या ठिकाणी आसरा घेवुन पाऊस जाण्याची वाट पाहण्यात येत होती.

सध्या हवामानात कमालीचा बदल जाणवत आहे, त्यातच दिवसभर कडक उन्हाचे चटके बसताहेत तर सायंकाळच्या सुमारास विजांसह जोरदार पावसाचे आगमन होत आहे. मंगळवारी ही सायंकाळी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी चारच्या सुमारासच जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यानंतर पुन्हा सायंकाळी 7 च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

गणपती बाप्पांचे देखावे पाहण्याकरीता जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच हिरमोड होत आहे. कारण वारंवार पाऊस येत असल्याने अनेकांकडून रात्रीच्या सुमारास बाहेर पडण्याचे टाळण्यात येत आहे. तसेच शाळेतून व ऑफीसमधुन घरी येणाऱ्यांची ही चांगलीच फजिती होत आहे. शहरातील अनेक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त काही सीन उभारले आहेत, काहींनी तर जिवंत देखावे ही सादर करण्यात येत आहेत. पण या वळीवाच्या पावसामुळे मंडळाच्या कार्यकत्यांना ही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार येणाऱ्या पावसामुळे मंडळाचे कार्यकर्ते ही चांगलेच नाराज होत आहेत. कारण बाप्पांची आरती करण्याकरीता ही पाऊस जाण्याची वाट पहावी लागत आहे.

शेती पिकांचे ही नुकसान
जोरदार पावसामुळे शेतकऱयांच्या शेतीपिकांचे ही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने खरिप कांदा, सोयाबीन, भुईमुग, बाजरी आदी पिकांवर याचा मोठ्ठा परिणाम झाला आहे. अनेक शेतामध्ये पाणी जश्यास तसे तुंबुन राहिले होते, त्यामुळे पिके कुजण्याची ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी जिल्हय़ात पावसाचे आगमन झाले, ऊनपावसाच्या या खेळामुळे मात्र नागरिकांच्या आरोग्यावर ही चांगलाच परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, ज्वर सारख्या आजाराने त्रस्त झालेल्या नागरिकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सरकरी तसेच अनेक खाजगी दवाख्यान्यामध्ये गर्दी दिसत आहे.

Related Stories

सातारा : ग्रेड सेपरेटरची खा. उदयनराजेंकडून पाहणी

datta jadhav

सातारा : वाठार किरोली येथे कोरोनाचा चौथा बळी, नवे दोन रूग्ण पॉझिटिव्ह

Archana Banage

’जम्बो’ त वेटिंग रुग्णांसाठी मिळणार सुविधा

Patil_p

सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करणे महिलेच्या अंगलट

Archana Banage

पंतप्रधानांना पाठवल्या रजिस्टर पोस्टाने शेणाच्या गोवऱया

Patil_p

सातारा : गृहराज्यमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

datta jadhav