प्रतिनिधी/कोयनानगर
नवजा गावा जवळ कोयना नवजा रस्त्याला मोठे भगदाड पडले असून, रस्ता वाहतूकिसाठी बंद करण्यात आला आहे. कोयना प्रकल्पा च्या वतीने काम चालू झाले असून, मोठा अनर्थ टाळला असल्याचे बोलले जात आहे.
कोयना ते नवजा रस्त्यावर ओझर्डे धबधबा व नवजा गावाच्या दरम्यान रस्त्यावर भले मोठे भगदाड पडले असून या भगदडा खाली मोरी असल्याने रस्ता मध्येच खचला आहे,. खाली मोरी आहे परंतु वर फक्त रस्त्याचा थरच शिल्लक होता, त्यामुळे आखादे वाहान या भगदाडात गेले असते तर मोठा अनर्थ घडला असता. जवळच ओझर्डे धबधबा असल्याने या मार्गांवर पर्यटकांची गर्दी असते परंतु ही घटना घडली त्यावेळी त्याठिकाणी कोणी न्हवते त्यामुळे मोठा अनर्थ टाळला असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा : मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक होणार; १ ऑगस्टपासून विशेष मोहीम : शेखर सिंह
वरून येणारे पाणी मोरितून पुढे न गेल्याने पाणी रस्त्याला भगदाड पाडून बाहेर आले असावे असे काही ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान कोयना ते नवजा हा रस्ता कोयना प्रकल्पच्या ताब्यात असल्याने कोयना प्रकल्पचे कर्मचारी जेसीबी घेऊन घटना स्थळी पोहचले असून तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या सोबत प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थान्नी रस्त्याला पडलेले निदर्शनास येताच झाडाच्या फ़ांद्या टाकून वाहतूक बंद केली त्यामुळेही पुढील अनर्थ टाळल्याचे सांगण्यात आले.