उंब्रज / प्रतिनिधी
आशियाई महामार्गावर वराडे ता. कराड गावचे हद्दीत कांबळेवस्ती नजीक दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तासवडे एमआयडीसीत कामासाठी जाणारे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला व पुरुष यांचा समावेश आहे. शुक्रवारी ८ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी कराड येथे दाखल केले आहे. जखमींची नावे समजू शकली नाहीत.
अधिक वाचा- गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपास ATS कडे सोपवा; कुटुंबीयांकडून विनंती