Tarun Bharat

SATARA-कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरूच, कोयनेचा पाणीसाठा ३१.३२ टीएमसी

सातारा- गेल्या चोवीस तासांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे धुमशान सुरू असून बारा तासांत कोयनेच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यन्त पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे १९१ मिलिमीटर, कोयना येथे १७७ मिलिमीटर , महाबळेश्वर १०२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

संततधार पावसामुळे कोयना धरण झपाट्याने भरत असून धरणात प्रतिसेकंद ३२ हजार २२२ क्यूसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी ८ पर्यंत कोयना धरणाची पाणीपातळी २०७९ फूट आणि ३१.३२ टीएमसी इतका झाली आहे. सोमवारी पहाटेपासून कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. येत्या पाच-सहा दिवसांत पावसाचा जोर राहिल्यास कोयना धरणाच्या पाणी साठ्यात पूर्ण क्षमतेने वाढ होऊ शकते.

Related Stories

मोठी घोषणा : दोन डोस घेतलेल्यांना ”या” तारखेपासून करता येणार लोकल प्रवास

Archana Banage

सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करणे महिलेच्या अंगलट

Archana Banage

तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

Abhijeet Khandekar

सांगली : मिरज शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके

Archana Banage

सातारा : हॉकर्स संघटनेचा उद्या मेळावा

datta jadhav

बुधवारच्या संपात सांगलीतील 50 हजार कामगार कर्मचारी सहभागी होणार

Archana Banage