Tarun Bharat

Satara; कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडले; धरणातून 10100 क्यूसेक विसर्ग सुरू

Advertisements

नवारस्ता / प्रतिनिधी

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्यची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाची निर्धारित पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी व आज दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8000 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान काल गुरुवार पासून धरणाच्या पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग चालू झाल्याने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10100 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी कोयना नदी दुथडी भरून वाहू लागल्याने राहणार आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणात 87.60 टीएमसी पाणीसाठा असून धरणात प्रतिसेकंद 49 हजार 524 क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.

Related Stories

संजदकडून रालोआल उमेदवाराला समर्थन

Patil_p

विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा सोमवारपासून

Sumit Tambekar

विदेशी संघांना क्वारंटाईनची सक्ती नाही

Patil_p

कामगार पलायनाचे दस्तऐवजीकरण व्हावे

Patil_p

देशात कोरोनाचा कहर सुरूच

Patil_p

सांगली जिल्ह्यात लसीकरण गतीमान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!