Tarun Bharat

Satara; मंत्री शंभूराज देसाई यांचे साताऱ्यात जंगी स्वागत; कार्यकर्त्यांचा भर पावसात जल्लोष

फटाके फोडले, घोषणांनी शिवतीर्थ दुमदुमले; प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले स्वागत

Advertisements

सातारा प्रतिनिधी

मंत्री देसाई साहेबांचा विजय असो…कोण आला रे कोण आला पाटणचा ढाण्या वाघ आला…शंभूराज देसाई साहेबांचा विजय असो अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांचे जंगी स्वागत राजधानी साताऱ्यात केले. मंत्री देसाई यांच्या वाहनांचा ताफा येताच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्या पावसातही फटाके कार्यकर्त्यांनी फोडत घोषणांनी शिवतीर्थ दणाणून सोडले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्य़ास पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या निवासस्थानी गेले.

मंत्रीपद भेटल्यानंतर प्रथमच मंत्री देसाई हे त्यांच्या निवासस्थानी शनिवारी येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी पाटण तालुक्यातून कार्यकर्ते, महिला स्वखर्चाने साताऱयात दाखल झाले. पोवई नाक्यावर सकाळी 10 वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी गर्दी केले होती. पाटण तालुक्यातून अभिजित पाटील, विजय पवार, सोमनाथ
खामकर, माणिक पवार, नामदेवराव साळुंखे, सागर सपकाळ, सोनावले, रवींद्र सपकाळ, सागर जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. प्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, सातारचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारच्या तहसीलदार आशा होळकर, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंत्री देसाई यांचे आगमन 12.31 मिनिटांनी होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

पालिकेचा पुष्पहार
मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्वागताचे नेटके नियोजन केले होते. ते स्वतः पावसात भिजत स्वागत केले. त्यांनी भांडारचे देवीदास चव्हाण यांना पुष्पहाराची सोय करण्याची सुचना दिली होती. त्यानुसार पालिकेचे चव्हाण यांनी पुष्पहार घेवून स्वतः थांबले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या तीन फेऱ्या
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पोवई नाक्यावर तीन फेऱया मारल्या. मंत्री देसाई यांच्या स्वागतासाठी ते स्वतः हजर राहणार होते. महसूल विभागाच्यावतीने प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह अधिकारीवर्गही यावेळी स्वागताला होते.

पेढ्यांची पळवापळव

साहेब मंत्री झाल्यानंतर त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी साताऱ्यात गर्दी केर्लीं होती. निवासस्थानी पोहचल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. तर काही गवश्या कार्यकर्त्यांनी पेढ्य़ांची पळवापळव केली.

यशराज देसाई हे स्वतः स्वागताला
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई हे स्वतः स्वागतासाठी आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून आपल्या वडिलांचे स्वागत साताऱ्यात अनोख्या पद्धतीने कार्यंकर्त्यांनी केल्याचे याची डोळी याची देही पाहिले.

Related Stories

सातारा : महाबळेश्वर शहर झाले कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

विनाकारण फिरणाऱया वाहनांवर कारवाईचा धडका

Patil_p

शिवसागर जलाशयात शक्तीशाली बोट तैनात

datta jadhav

जिल्हय़ात कडक लॉकडाऊनला आरंभ

Patil_p

सातारा पालिकेने लाकूड पुरवठय़ाचा ठेकेदार बदलला

Patil_p

बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ तिहेरी अपघात; एक ठार

datta jadhav
error: Content is protected !!