सातारा प्रतिनिधी
सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाटकळ माथा आणि वडूथ दरम्यान मार्गावर गोकूळधाब्या समोर भरधाव सेंट्रोने धडक दिल्याने रस्त्यावरून निघालेला पादचारी जागीच ठार झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की आज सायंकाळी साडेचार च्या दरम्यान पाटखळ माथा ते वडूत दरम्यान असलेल्या गोकुळ ढाबा येथील आचारी विजय हा जेवण संपल्यानंतर वडूज च्या दिशेने पायी चालत निघाला असताना साताऱ्याच्या दिशेने निघालेली सेंट्रो कार क्रमांक एम एच 11 वाय 6598 या कार ने समोरून जोरदार धडक दिले व विजय याला गाडीखाली जवळपास 50 फुटापर्यंत फरफटत नेले व पुढे जाऊन कार पलटी झाली यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र विजय हा जागेवरच ठार झालेला होता याबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे खबर दिल्यानंतर पोलीस या ठिकाणी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा केला वाहन चालक किरण संपत कदम हा खेडनांदगिरी चा राहणारा असून घटनेवेळी तो नशेत असल्याचे आढळून आले या अपघातात चालक ही जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे
मयत विजय हा येथील गोकुळ ढाबा येथे गेल्या सात वर्षापासून आचारी म्हणून काम करत होता तो मूळचा ओरिसा या ठिकाणचा असल्याने उत्तरीय तपासणीनंतर त्याचे वडूथ येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे समजते या अपघाताबाबत तालुका पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे