Tarun Bharat

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

कार्यक्रमानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन : प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख

Advertisements

प्रतिनिधी/सातारा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी दिली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त करावयाच्या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे व विविध विभागाचे अधिकारी आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक विभागाला नेमून दिलेली कामे नियोजनबद्धरितीने पूर्ण करावीत. हर घर तिरंगा उपक्रमाला लोकसहभाग मिळण्यासाठी जिह्यातील प्रत्येक संस्था व कुटुंब सहभागी होईल यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत. जिह्यातील भिलार, नायगाव, कटगुण, धावडशी, पाटेश्वर, मर्ढे, वाई अशी व अन्य महत्वाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. हर घर तिरंगा उपक्रम राबवितांना ध्वजसंहितेचे काटेकोर पालन होईल याकडे सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाच्या बाबतीत विविध विभागांनी पार पाडावयाच्या जबाबदारीच्या नियोजनाची माहिती दिली.

Related Stories

मिळकतधारकांना 15 दिवसांची डेडलाईन

Amit Kulkarni

केंद्र सरकारला पळ काढता येणार नाही

Amit Kulkarni

चारभिंतीवर कंदिल लावून सेनेची पालिकेला श्रद्धांजली

Patil_p

पावसाचे पाणी खासदारांच्या घरातही घुसले

Patil_p

सातारकरांवर मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांची दहशत

Amit Kulkarni

दोन हजार पन्नास

Patil_p
error: Content is protected !!