Tarun Bharat

घराबाहेर झोपलेल्या तरुणाचा गळा चिरून खून

ऑनलाईन टीम / पुणे :

पाडेगाव (ता. फलटण) येथील शिवंचा मळा येथे घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी धारधार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. (young man Murder by slitting the throat in padegoan, satara) राहुल नारायण मोहिते (Rahul Mohite) (वय 31) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाडेगाव गावठाण पासून दोन किमी अंतरावर असलेल्या शिवंचा मळा येथील आपल्या राहत्या घराबाहेर राहुल झोपला होता. रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी धारधार शस्त्राने गळा चिरून खून त्याचा केला. आज सकाळी उठल्यावर राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. कुटुंबियांनी तात्काळ डॉक्टरांना बोलावले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पीएसआय गणेश माने, स्वाती पवार घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे.

Related Stories

बालसुधारगृहात नक्की चाललंय तरी काय?

datta jadhav

कोल्हापूर : दहा तोळे सोन्यासाठी वृद्धेचा खून

Archana Banage

जिल्हय़ात पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरु

Patil_p

सातारा : शिवराज पेट्रोलपंप परिसरात अनोळखी मृतदेह आढळला

Archana Banage

सोलापूर : माढा सबजेलमधून पळालेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; दोघे अद्याप फरार

Archana Banage

साताऱ्यात सैन्य भरतीसाठी युवक-युवती आक्रमक

datta jadhav